गरज पडल्यास दोन कोटी जादा देऊ - आमदार सुनील आण्णा शेळके
प्रेस मीडिया लाईव्ह :
फकीर मोहम्मद ई बागवान :
पुणे: काल, शुक्रवार, 07 सप्टेंबर 2024 रोजी मावळचे आमदार श्री.सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते दर्गा स्मशानभूमीच्या कुंपण भिंतीचे आणि अनाथाश्रमाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. या उद्घाटन कार्यक्रमात लोणावळा आणि आजूबाजूच्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले
यावेळी जिशान भाई यांनी आमदार साहेबांना अनाथाश्रमाच्या इमारतीच्या पूर्ण बजेट बद्दल माहिती देऊन यासाठी 40 लाखांचा निधी अपुरा पडत असून आणखी 1 ते 1.5 कोटी रुपये लागतील जिशान भाईंचे शब्द आणि त्यांच्या कामाची खोली समजून घेऊन आमदारांनी लगेचच 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आणि गरज पडल्यास आणखी 1 कोटी रुपये (एकूण 2 कोटी रुपये) देण्याची जाहीर केले