प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : अतिक्रमण निरीक्षक,सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यांचे संबंधितांशी हितसंबंध निर्माण होऊ नयेत,म्हणून दर तीन महिन्यांनी बदल्या करण्याचे धोरण पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने तयार केल्याबद्दल जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे अध्यक्ष संजय आल्हाट, सरचिटणीस रणजीत सोनावळे ,कन्हैया पाटोळे या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांची भेट घेऊन या धोरणाचे स्वागत केले आणि पाठिंबा व्यक्त केला. बायोमेट्रिक सर्वे होत नाही तोपर्यंत पथारी फेरीवाला विक्रेत्यांवर कारवाई करू नये,अशी मागणीही करण्यात आली.
अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांच्या जर तीन महिन्याने ऑनलाईन बदली होणार असतील अतिक्रमण कारवाईत सातत्य राहील . वर्षानुवर्षे एकाच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत राहून काम करणाऱ्या निरीक्षकांमुळे कारवाईत दुजाभाव होत होता. अतिक्रमण विरोधी कारवाईत अधिकाधिक पारदर्शीपणा यावा,त्याचा नियमित अहवाल आयुक्तांना दिला जावा ,असे आवाहन जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाच्यावतीने करण्यात आले . पथारी विक्रेत्यांचे सर्वेक्षण करून केंद्र सरकारच्या योजनेचे लाभ त्यांना मिळावेत अशी मागणी याआधीच संघाने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना भेटून केली होती.तसेच आयुक्त पातळीवर वारंवार पाठपुरावा केला होता.