प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : माहिती व जनसंपर्क विभागातील सेवानिवृत्त छायाचित्रकार नितीन उत्तमराव सोनवणे यांचे दिनांक १ सप्टेंबर रोजी कर्करोगाच्या आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची आई पुष्पा, पत्नी प्रमिला, दोन मुली पूर्वा व उत्तरा तसेच दोन बंधु असा परिवार आहे.
कै. सोनवणे यांचे बालपण पुण्यात गेले. येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण तर नवरोसजी वाडिया कॉलेजमध्ये त्यांनी बीएपर्यंत शिक्षण घेऊन पुढे पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली. त्यांनी आपला छायाचित्रणाचा छंद जोपासला. व याचा फायदा पुढे त्यांना शासकीय सेवेत नोकरी मिळण्याकरिता झाला. १८ जानेवारी १९९९ रोजी माहिती व जनसंपर्क विभागाच्या सेवेत छायाचित्रकार म्हणून कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात रुजू झाले. त्यानंतर त्यांची २०११ मध्ये पुणे विभागीय माहिती कार्यालयात बदली झाली. छायाचित्रणा बरोबरच उत्कृष्ट बातमी लेखनही ते करत होते. नितीन सोनवणे यांना गायनाची खूप आवड होती. अतिशय मनमिळाऊ असलेल्या नितीन सोनवणे यांच्या जाण्याने त्याच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.