सिरत कमिटीचे अध्यक्ष मोलाना गुलाम अहमद कादरी यांचा नेतृत्वाखाली निघालेल्या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने सामील होते
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती मिरवणूक मनुशाह मस्जिद नाना पेठ या ठिकाणापासून सकाळी साडेनऊ वाजता सुरू होऊन नाना पेठ, एडीकेम चौक, निशात टाकीज, भगवानदास चाळ, मुक्ती फौज चौक, शिवाजी मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, कुरेशी मज्जिद, एमजी रोड, महावीर चौक, साचापिर स्ट्रीट, कॉर्टर गेट, लक्ष्मी रोड, संत कबीर चौक नाना पेठ, गणेश पेठ हमजे खान चौक मार्ग, रांका ज्वेलर्स या मार्गाने बागवान मस्जिद, सुभान शहा दर्गा, जामा मस्जिद या ठिकाणी दुपारी दोन वाजता त्याचे समारोप झाले.
सिरत कमिटीचे अध्यक्ष मोलाना गुलाम अहमद कादरी यांचा नेतृत्वाखाली निघालेल्या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने सामील होते त्यासोबत सर्वधर्म समाज बांधव ही उपस्थित होते. मोठ्या संख्यात लहान मुलं या मिरवणुकीत सहभागी झाले होते प्रेषित महंमद पैगंबर यांची मिरवणूक शांततेत पारंपरिक पद्धतीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर नाआते शरीफ, हमद व सना याचे गायन करून मिरवणूक निघाली होती विशेषतः या संपूर्ण मिरवणुकीमध्ये शेवटपर्यंत कोणताही डीजे लावलेला मंडळाला सामील करून घेतलेले नाही सिरत कमिटीने सांगितल्याप्रमाणे यंदाची मिरवणूक शांततेत व पूर्णपणे डीजे मुक्त असल्याचे चित्र आजच्या पैगंबर जयंतीच्या मिरवणूक दिसून आले.
फोटो व अधिक व्हिडिओ साठी संपर्क करा अंजुम इनामदार
9028402814