धायरी सिंहगड परिसरात स्कूल व्हॅन चालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पालक हैराण : कारवाईची आम आदमी पक्षाची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : धायरी, सिंहगड रोड  खाजगी स्कूल व्हॅन चालकांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त झाले आहेत.तसेच  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.धायरी येथील डिएसके स्कूल मधील खाजगी स्कूल व्हॅन चालकांची अरेरावी सुरू आहे तर इतर शाळांतील खाजगी स्कुल बस, व्हॅन तसेच रिक्षा चालक पालकांना वेठीस धरत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. या प्रकारामुळे पालक हैराण झाले आहेत.

संबंधित शिक्षण संस्था, शिक्षण विभाग व वाहतूक पोलीस,परिवहन विभागाने विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खाजगी स्कूल व्हॅन चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे ‌

याबाबत बेनकर यांनी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

बेनकर म्हणाले , या परिसरात नामांकित शिक्षण संस्थाही इतर खाजगी संस्थांच्या पन्नासहून अधिक शाळा आहेत.  शिक्षण संस्था,शिक्षण विभाग व वाहतूक पोलीस, परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे खाजगी स्कूल व्हॅन चालक अरेरावी करत आहेत. पालकांना वेठीस धरत असुन आर्थिक लुबाडणूक करत आहेत. त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे आज ड्रायव्हर नाही,व्हॅन बंद पडली आहे, बाहेरगावी गेलो आहे. त्यामुळे व्हॅन येणार नाही असे सांगून अधुनमधून व्हॅन चालक पसार होत आहेत. एका वॅन मध्ये क्षमतेपेक्षा चार पट अधिक मुलं कोंबत आहेत   

त्यामुळे विद्यार्थ्यांना ऐनवेळी खाजगी वाहनाने शाळेत जावे लागते. काही विद्यार्थी शाळेतही जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.पालकांकडून मात्र  संपूर्ण महिन्याचे भाडे मात्र व्हॅन चालक वेळेवर वसुल करत आहेत. 

पालकांकडून अगोदर प्रवास भाड्याची अनामत रक्कम घेतली जाते.  महिना पूर्ण होताच उर्वरित सर्व भाडे घेतले जाते असे असताना व्हॅन चालक पालकांना  अचानक  रात्री मोबाईलवर उद्या गाडी नाही असा मेसेज पाठवून पसार होतात. पालकांनी कारण विचारले तर दुसरी गाडी बघा.  विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील फक्त दहा महिनेच  शाळेत  व तेथून घरी सोडले जाते. या शिवाय महिन्यात रविवार व इतर सुट्ट्यां मिळुन पाच ते सात दिवस सुट्ट्या असतात. असे असताना संपूर्ण महिन्याचे भाडे घेऊन व्हॅन चालक पालकांना वेठीस धरत आहेत. 

याबाबत   शाळेत तक्रार दखल घेतली जात नसल्याचे पालकांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post