प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावी अशी मागणी महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांकडून सातत्याने करण्यात येत आहे याच अनुषंगाने काल हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी कोंढवा येथे पुणे शहरातील आजी-माजी मुस्लिम नगरसेवक, सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष, मुस्लिम धर्मगुरू, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटना संस्थांचे प्रतिनिधी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांची संयुक्त बैठक मुस्लिम राजकीय मंचाचे वतीने आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व संमतीने पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते ॲड. अय्युब शेख यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव करण्यात आला. तसेच नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेत दिला नाही म्हणून व तसेच नुकताच विधान परिषदचे दोन जागा रिक्त झाल्याने तेथेही मुस्लिमांना न्याय दिला नाही म्हणून राज्यात प्रचंड प्रमाणात मुस्लिमांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापुढे महाविकास आघाडी कडून मुस्लिम समाजावर अन्याय होऊ व योग्य ते मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून पुणे शहर व जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघापैकी आगामी विधानसभा निवडणुकीत किमान दोन मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीने दिली पाहिजे अशी मागणी मुस्लिम राजकीय मंचाचे वतीने करण्यात आली. त्याकरिता मुस्लिम राजकीय मंचाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळ लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटून त्यांना विनंती करण्याचा ठराव ही आजच्या बैठकीत मांडण्यात आला.
जमियत ओलमा हिंदी पुणे जिल्हाध्यक्ष कारी ईद्रीस अन्सारी यांच्या अध्यक्षता खाली झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक ॲड. गफूर पठाण, माजी नगरसेवक मुक्तार शेख, माजी नगरसेवक मंजूर शेख, माजी नगरसेवक मुनाफ शेख, स्वीकृत सदस्या हसीना इनामदार, माजी नगरसेविका चांदबी नदाफ यांचे चिरंजीव महबूब नदाफ, मुस्लिम धर्मगुरू मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन, मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स पुणे शहराध्यक्ष निसार सागर, शिवसेना नेते जावेद खान, ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन अध्यक्ष इकबाल अन्सारी, ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष जाहीद शेख, मुस्लिम बँकचे व्हाईस चेअरमन अली इनामदार, डायरेक्टर बबलू सय्यद, सय्यद सईद, सादिक लुकडे, सिराज बागवान, ॲड. साबीर शेख, इतिहास संशोधक ताहीर शेख, मौलाना शबीह हसन कासमी, विक्रम भाईजान, सौ. रजिया भल्लारी, सौ. गुलशन शेख, सौ. नाझिया शेख, सौ. शमीम पठाण, इब्राहिम खान, इब्राहिम यवतमाळ वाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भागीदारी बैठकीचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांनी केले तर आभार प्रकट नदीम मुजावर यांनी केले.
सदर ठरावाच्या प्रती या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना पाठवण्यात येणार असून राजकीय पक्षांकडून अय्युब शेख यांना उमेदवारी मिळावी अशी मुस्लिम समाजाची अपेक्षा आहे दरम्यान कोणत्याही राजकीय पक्षांनी विचार केला नाही तरी मुस्लिम समाज दलित समाज व ख्रिश्चन यांची वैयक्तिक संबंध असलेले सर्व समाज बांधव यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवून विजय प्राप्त करू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रसिद्धी प्रमुख
मुस्लिम राजकीय मंच
अंजुम इनामदार
9028402814