मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व कसे देता येईल यासाठी लवकर महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा --पटेल जैनोदीन रावणगांवकर

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

राज्यात लोकसभेत मुस्लिम समाजास डावललं, त्यांनी आता विधानसभेत नांदेड मधून मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी, मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व कस देता येईल यासाठी लवकर महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा.नांदेड शहरातील दोन्ही मतदार संघ नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या संघात अल्पसंख्याक मुस्लिम समाज मतदारांची संख्या ही आधिक आहे. महाविकास अघाडी सह इतर पक्षास मुस्लिम समाजाचे मतदान लागतात परंतू मुस्लिम समाजास राजकिय क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यास  महाविकास आघाडीस कदाचित एलर्जी आहे काय..?  हे मुस्लिम समाजास समजेनासे झाले आहे . 


राज्यात परवा पार पडलेल्या लोकसभेत एकही मुस्लिम उमेदवार दिले नाही तरीही मुस्लिम समाज बहुमताने महाविकास आघाडीच्या  उमेदवाराला मतदान देऊन निवडून आणले आहेत. परवा झालेल्या नांदेड लोकसभा मतदार संघातील निवडणूकीत कांग्रेस पक्षाचे निवडून आलेले खासदार कै . वसंतराव चव्हाण साहेब यांना नांदेड उत्तर मधून ४० हजारावर मताची लिड दिले तर नांदेड दक्षिण मधून 18 हजारावर मताची लीड दिले. या दोन्ही मतदार संघात मिळालेल्या बहुमतात मुस्लिम समाज बांधवाचा मोलाचा वाटा आहे . हे महाविकास आघाडी ने विसरू नये ? मुस्लिम बांधव महाविकास सोबत आहेत. परंतू झालेली निवडणूक लोकसभा होती ? लोकसभा निवडणूक झाल्या नंतर लगेच कांही दिवसात विधानपरिषदेवर तरी महाविकास आघाडी कडून मुस्लिम चेहरा विधानपरिषदेवर घेतील असेे वाटले होते परंतू नांदेड मधून मुस्लिम समाज एकवटून खासदार निवडून आणले असताना सुद्धा महाविकास ने विधान परिषेदवर मुस्लिम समाजाला घेतले नाही ? आणि घ्यावे असे  महाविकास आघाडीस असे वाटले नाही. मुस्लिम समाज फक्त महाविकास आघाडी साठी मतदान द्यावयाचेच का ? असा मुस्लिम समाजाला पडलेला प्रश्न आहे ? 


मुस्लिम समाज ज्या परीने तन - मन - धनाने महाविकास आघाडी सोबत राहिला त्या प्रमाणे महाविकास आघाडी सुद्धा मुस्लिम समाजाच्या पाठीसी राहवयाला पाहिजे होते पण तसे होताना दिसून येत नाही ? मुस्लिम समाज जसे महाविकास सोबत रहात आहे तसे महाविकास आघाडी ने सुद्धा मुस्लिम समाजाला सोबत आहे हे विश्वास दाखवण्या साठी नांदेड मधून महाविकास आघाडी ने पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मुस्लिम समाजास उमेदवारी द्यावी  पुढे महानगर पालीका येणार आहे जर महविकास अघाडीचा मुस्लिम आमदार आसेल तर महापालिके वर महाविकास अघाडीचा महापौर आसेल या सर्व बाबीचा विचार करून उमेदवारी द्यावा आशी मागणी मुस्लिम बांधवा कडून नांदेड मधून करण्यात येत आहे . राज्यात महाविकास आघाडी मुस्लिम समाजास लोकसभेत डावलले आता विधान सभेत उमेदवारी देणार का ? याबाबतची स्पष्टताही द्यावी अशी मुस्लीम सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.

"लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लीम मतदान एक महत्त्वाचा फॅक्टर ठरला होता. मात्र असं असलं तरीही महायुती किंवा महाविकास आघाडीमधील एकाही मोठ्या पक्षाने लोकसभेला एकाही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाजातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी यासाठी मुस्लीम सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून विशेष मोहीम चालवली जात आहे.महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने भरभरून केलेल्या मतदानामुळे महाराष्ट्रातील राजकीय गणित पूर्णतः बदलले आहे. मुंबईत देखील मुस्लीम समाजाने केलेले मतदान निर्णायक फॅक्टर ठरला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजाला विविध राजकीय पक्षांमधून उमेदवारी मिळावी यासाठी मुस्लीम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बैठक सत्र सुरू केल आहे. 


लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाज मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. मात्र मुस्लीम उमेदवार प्रमुख राजकीय पक्षांनी दिले नव्हते. विधानसभेत हीच परिस्थिती राहू नये अशी अपेक्षा मुस्लीम समाजाची आहे.मुस्लीम समाजाला राजकीय प्रतिनिधित्व अपेक्षित आहे. पण त्याचबरोबर प्रत्येक राजकीय पक्षाच्या अजेंड्यात ,वचननाम्यात मुस्लीम समाजाचा सामाजिक, शैक्षणिक मागासले पण दूर व्हावे यासाठी काय नियोजन आहे. याबाबतची स्पष्टताही यावी अशी मुस्लीम सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी 11.54 टक्के मुस्लीम आहेत. महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या 1.30 कोटी आहे. मात्र आता 2024 साल आहे. मुस्लीम समाजाच्या लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ, भिवंडी, ठाणे, रायगड संभाजीनगर, धुळे ,परभणी , नांदेड , ,वाशिम ,अकोला या जिल्ह्यांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. यावर लवकरच महाविकास आघाडी सह इतर राजकिए पक्षाने मुस्लिम समाजाची मागणीचा विचार करतील असा विचार करू या !


पटेल जैनोदीन रावणगांवकर 

शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा संघटक नांदेड ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )

8530828612

Post a Comment

Previous Post Next Post