प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड: दाते सुरेखा उपशिक्षिका नवमहाराष्ट्र विद्यालय. पिंपरी पुणे १७ येथे दिनांक २५.नोव्हेंबर, २०२१ रोजी शाखेत बदली होऊन आले. त्यानंतर मुख्याध्यापक गाढवे.के.डी.१.सप्टेंबर २०२२ रोजी शाखेत आले.मागच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये दाते यांनी रयत बँकेच्या निवडणुकीत संचालक पदासाठी उभे होत्या. निवडणूकीसाठी किंवा इतर कामांसाठी रजा मागीतली असता गाढवे सर म्हणायचे अगोदर रजेची मंजुरी आणा मग मिळेल.निवडणुकीच्या काळात रजेवरून तीन वेळेस त्यांच्यात वाद विवाद झाले. इतर शिक्षिकांना विचारले असता त्यानी गाढवे सरांना फोन करून सांगते त्या मॅडमना रजा द्या त्या दिवशी साडेपाच नंतर शाळा सुटल्यावर सरानी मला थांबवून घेतले व मला म्हटले आपल्या दोघांमधील विषय तुम्ही इतरांना का सांगता.तुम्हाला माझ्या हाताखाली नोकरी करायची आहे.तुमचा रिपोर्ट माझ्या हातात आहे.माझ्या रिपोर्टवर तुमची बदलीसुद्धा होऊ शकते. अशा प्रकारे त्यानी दाते मॅडम यांना धमकी दिली दातेना टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला.*त्यानंतर वारंवार मुख्याध्यापक गाढवे सरांनी ऑफ तासाला केबिनमध्ये बोलावून तुम्ही खुप फ्रेश दिसता. छान दिसता. तुम्ही मला खुप आवडता असे अश्लील व घाणेरड्या भाषेत माझ्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली.*
354/A,323,504,509,34 या कलमानुसार सदर मुख्याध्यापक यांचेवर पिंपरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरीसुद्धा रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बंडू पवार यांच्याकडून मुख्याध्यापकास पाठीशी घातले जात आहे.आमची या पत्रकाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव पवार यांची चौकशी करावी आणि मुख्याध्यापकास तात्काळ निलंबित करण्यात यावे.अन्यथा येत्या काही दिवसांत आम्ही रयत शिक्षण संस्थेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू याची नोंद घ्यावी.असा इशारा आपचे रविराज काळे यांनी दिला.