मावळ मुळशी प्रांत कार्यालयावर प्रांत अधिकाऱ्यांची " नोटतुला आंदोलन "
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड : अवैध गौणखनिज च्या माध्यमातून करोडोंचा महसूल घोटाळा अपना वतन संघटनेने उघडकीस आणला आहे. पिंपरी चिचंवड मावळ मुळशी कार्यक्षेत्रामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक तलाठी , मंडलाधिकारी , तहसीलदार या महसूल अधिकाऱ्यांसोंबत संगनमत करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत . असाच एक प्रकार अपना वतन संघटनेने उघडकीस आणलेला आहे.
सोनिगरा रिअलकॉन , क्रिसला इन्फोकोन , व्हीटीपी रियालिटी या बांधकाम कंपन्यांनी विना परवाना गौणखनिज उत्खनन केलेबाबत अपना वतन संघटनेने तक्रार केली होती . त्यानुसार या बिल्डरांना १० कोटींचा दंड लावण्यात आलेला होता . परंतु सदरचा दंड तत्कालीन प्रांत अधिकारी संदेश शिर्के , मुळशी तहसीलदार , नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांनी चक्क रद्द केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे . त्यामुळे मंगळवार दि १०/०९/२०२४ रोजी अपना वतन संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय बावधन याठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांची " नोटतुला " हे अनोखे आंदोलन केले होते . या आंदोलनावेळी नागरिक महिला यांनी आपापल्या समस्या मांडल्या व त्यांनीही तराजू मध्ये प्रांत अधिकारी यांची प्रतिमा ठेऊन दुसऱ्या बाजूला ५०० च्या नोटांचे बांदल ठेऊन प्रांत अधिकाऱ्यांची नोट तुला करीत आपला रोष व्यक्त केला . यावेळी मावळ मुळशी प्रांताचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली . अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी महसूल बुडवण्यास कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली . यावेळी सदर प्रकरण पुनरावलोकनासाठी परवानगी देण्याचे आश्वासन दिले . तसेच इतर प्रकरणात उप जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला जाईल अशी खात्री दिली . त्यामुळे सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले .
यावेळी आंदोलनामध्ये अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , राज्य संघटक हमीद शेख , शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा , शहर संघटक गणेश जगताप , शिवशाही व्यापारी संघटनेचे युवराज दाखले , आरपीआय ( A ) राज्य संघटक कैलास जोगदंड , रिपब्लिकन सेनेचे दत्ताभाऊ गायकवाड , युवा वादळ संघटनेचे युवराज भास्कर , तौफिक पठाण , वासिम पठाण , मलंग शेख , बाळासाहेब वाघमारे , रऊफ शेख , संतोष सुतार , कयूम पठाण , विकास पांडागळे , दीपक जाधव , युवा नेते प्रमोद शिंदे , अमोल सावदेकर , अमोल उबाळे , मछिंद्र गायकवाड , दादासाहेब ढवळे यांच्यासहित अनेक कार्यकारत मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अपना वतन - सर्वसामन्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढणारी राष्ट्रप्रेमी संघटना