-कै.मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांचा हेअर अँड ब्युटी सेमिनार संपन्न .
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : आपण सुंदर, आकर्षक दिसावे असे प्रत्येकाला वाटते, आपल्या सभोवताली अनेक ब्युटी पार्लर, सलॉन असत्तात आपण मात्र आपल्याला कोण चांगल दाखवू शकतो त्यामध्ये जात असतो. तर एका व्यक्तीने जगातील प्रत्येकजण कसा चांगला दिसेल, कुणाला कोणती हेअर स्टाइल शोभेल असा विचार केला आणि आपल्या कामाच्या माध्यमातून जगभर नाव पोहोचवले ती व्यक्ती म्हणजे इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया. आज त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांचे काम पहाण्याची संधी पिंपरी - चिंचवड मधील महिलांना मिळाली.
निमित्त होते , कै.मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने पिंपरी चिंचवड मधील ब्युटीशियन साठी आरंभ बँक्वेट हॉल, बी.आर.टी. रोड, विजय नगर, काळेवाडी येथे भारतातील इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांच्या एकदिवशीय मोफत हेअर अँड ब्युटी सेमिनारचे यावेळी आयोजक, माजी नगरसेवक, अ.भा.म. नाट्य परिषद पिं.चिं. शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट ) महा प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,संयोजक सविता प्रसाद कदम, डॉ. तृप्ती धनवटे, जितेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरीश भाटिया यांची कन्या रिंकू, स्नुषा डॉली आणि भाची करिश्मा यांनीही महिलांना मार्गदर्शन करत प्रात्यक्षिक दाखवले.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर हे ग्लोबल शहर होत चालले आहे. कामगार नगरी अशी ओळख असलेले शहर आज विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. कोविड काळात ब्युटीशियन उद्योगातील महिलांचे मोठे हाल झाले. आज भाटीया सरांच्या सेमिनारच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या व्यवसायातील ट्रेंडस आणि अन्य महत्वपूर्ण बाबी शिकण्याची, समजून घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. याचा ब्युटीशियन भगिनींना त्यांच्या व्यवसायात उपयोग होईल.
या सेमिनार मध्ये 500 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. लकी ड्रॉ द्वारे निवड झालेल्या महिलांना हरीश भाटिया यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच सहभागी प्रत्येक महिलांना या सेमिनार मध्ये सहभागाचे सर्टिफिकेट व खास गिफ्ट देण्यात आले.
डोळ्यांवर पट्टी बांधून केला हेअर कट
पिंपरी चिंचवड मधील ब्युटीशियन महिलांना आज पहिल्यांदाच इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांच्या कलेची जादू जवळून अनुभवता येणार होती. भाटीया यांनी महिलांना व्यावसायंतील आणि कलेतील अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन केले. तसेच आपल्या कामाशी आपण प्रामाणिक असू तर डोळे झाकूनही काम करू शकतो याचा दाखला देत एका मुलीचा हेअर कट करताना चक्क डोळ्यांवर पट्टी बांधली आणि आपल्या अदभूत कलाविष्काराने महिलांना अचंबित केले.