आंतरवासिता राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली (पु.) येथे पार पडली.

या  प्रात्यक्षिकांतर्गत आंतरवासिता उत्तर आठवडा या कालावधीमध्ये अहवाल वाचन व सादरीकरण घेण्यात आले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव येथे बी.एड्. द्वितीय वर्ष  अंतर्गत आंतरवासिता टप्पा क्रमांक-२  या प्रात्यक्षिकांतर्गत आंतरवासिता उत्तर आठवडा या कालावधीमध्ये अहवाल वाचन व सादरीकरण* घेण्यात आले. आंतरवासिता टप्पा क्रमांक दोन अंतर्गत विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते .गट क्रमांक एक यांनी श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पेठ वडगाव येथे आंतरवासिता पूर्ण केली. गट क्रमांक दोन या गटाची आंतरवासिता राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली (पु.) येथे पार पडली. 

या आंतरवासितेमध्ये १५ जुलै ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत छात्राध्यापकांनी अध्ययन-अध्यापनाबरोबरच शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले. यामध्ये विविध स्पर्धा व ऍक्टिव्हिटी राबविण्यात आल्या. आंतरवासितेदरम्यान आलेल्या सर्व अनुभवांचे कथन व सादरीकरण शनिवार दिं. २१ सप्टेंबर, २०२४ रोजी घेण्यात आले.या सादरीकरणादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्याला आंतरवासितेमध्ये आलेले सर्व प्रत्यक्ष अनुभवांचे कथन केले व आंतरवासिता कालावधीमधील आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. या सादरीकरणादरम्यान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.निर्मळे आर.एल., सर्व प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व छात्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गटवार व वैयक्तिक अहवाल सादरीकरण केले. सादरीकरण करत असताना विद्यार्थ्यांनी इंटरनेट व माध्यमांचा वापर करून प्रेझेंटेशन द्वारे आंतरवासिता अनुभव कथन केले.सर्व छात्राध्यापकांच्या अनुभव कथन व सादरीकरणानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकाळात उत्तम शिक्षक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या व सुयोग्य मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या निवेदता पाटील व वनिता कोंडेकर या विद्यार्थिनींना बक्षीस  देऊन गौरविण्यात आले. आंतरवासिता दरम्यान उत्कृष्ट मुख्याध्यापक व पर्यवेक्षक  म्हणून काम करणाऱ्या सुप्रिया गिरीगोसावी व शीलाताई पाटील यांनाही भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.शेवटी अक्षय  शिपुरे या छात्राध्यापकाने कार्यक्रमाचे आभार मानून सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post