प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचालित, "कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड.), पेठ वडगांवचा “३८ वा वर्धापनदिनाचा सोहळा”रविवार दिनांक १५/०९/२०२४रोजी मोठ्या उत्साहाने कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये "सत्यनारायण पुजा व प्रसादाचे आयोजन केले होते. तसेच महाविद्यालयाच्या प्रांगणात वर्धापन दिनानिमित्त माननीय प्राचार्या डॉ. निर्मळे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास कॉलेजचे अध्यक्ष मा. श्री विजयसिंह माने, संचालक बाळासाहेब घोटणे, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे सर्व शाखांचे प्राचार्य, कॅम्पस मधील व इतर सर्व संस्था अंतर्गत शाखांमधून पदाधिकारी, प्राचार्य व कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते व सर्वांनी सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयांस शुभेच्छा दिल्या . कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निर्मळे.आर.एल, प्राध्यापक छात्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अशा रीतीने कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड.) पेठ वडगांव येथे सर्व अतिथीच्या उपस्थितीने वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न झाला.