प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे बी. एड्.व्दितीय वर्षातील सेमीस्टर 3 मधील शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक 2 शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकांतर्गत आंतरवासिता गट क्रमांक एक "श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्यूनि.कॉलेज पेठ वडगाव". येथे आंतरवासिता संपन्न झाली.ही आंतरवासिता दिनांक 15/07/2024 पासून सुरू करण्यात आली होती. या आंतरवासिते दरम्यान छात्राध्यापकांनी अध्ययनाबरोबर वेगवेगळे उपक्रम राबविले. यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा (मराठी व इंग्रजी), रंगभरण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,General Knowledge, मेहंदी स्पर्धा, शिक्षक दिन,विज्ञान प्रयोगशाळा भेट, ग्रंथालय भेट, वनभोजन, झिम्मा फुगडी, क्रीडा, कवायत, प्रश्नमंजुषा त्याचप्रमाणे
ग्रीन क्लब ऍक्टिव्हिटी मध्ये पर्यावरण पूरक गणपती व्याख्यान, मातीचा गणपती बनवणे, गांडूळ खत माहिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग माहिती, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. शनिवार दिनांक 14/09/2024 रोजी आंतरवासितेचा सांगता समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कोंडेकर एस. एच.सर हे होते.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.सौ. निर्मळे आर.एल.उपस्थित होत्या.इतर उपस्थितीमध्ये प्रा. श्री.सोरटे एस.के.,प्रा.सौ.सावंत ए.पी.,प्रा.सौ. शिरतोडे व्ही.एल.,प्रा. डॉ. पवार ए.आर., ग्रंथपाल सौ.चौगुले एस.एस.,विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आंतरवासिता गटातील छात्रमुख्याध्यापिका गिरीगोसावी सुप्रिया, छात्र उपमुख्याध्यापिका सूर्यवंशी अश्विनी, तसेच सर्व छात्राध्यापक ,छात्राध्यापिका , विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या गटाचे शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिक प्रा .सौ.सावंत ए.पी., प्रा. श्री.सोरटे एस.के. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्राध्यापिका निवेदिता पाटील तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका अपर्णा काटकर व सदफ मोमीन यांनी केले. आंतरवासितेदरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच छात्राध्यापकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच गटाच्या मार्गदर्शिका प्रा. सावंत ए.पी. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे कोंडेकर सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी आपल्यातले गुण ओळखावे ज्यात आवड आहे त्याचं शिक्षण घ्यावं.शिक्षक हा पेशा नसून एक जबाबदारी आहे याची जाणीव करून दिली. त्याचप्रमाणे बी.एड्. शाखेकडे पर्यायी मार्ग म्हणून न पाहता आपल्या आवडीने या क्षेत्रामध्ये यावे. छात्राध्यापकानी उत्तम शिक्षक व्हावं अशा शुभेच्छा दिल्या व छात्राध्यापकांचे भरभरून कौतुक केले.
महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ. निर्मळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की ,आपल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवला पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यावर भर दिला पाहिजे. तसेच आंतरवासितेसाठी शाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल एक छोटीशी भेटवस्तू शाळेला देऊन शाळेचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी छात्राध्यापिका शुभांगी पाटील यांनी आभार मानले . अशाप्रकारे ही आंतरवासिता टप्पा क्रमांक दोन अगदी व्यवस्थितरीत्या पार पडली.