प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई:---बदलापूरमधील एका शाळेतील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काऊंटर झाला. सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. मात्र विरोधकांनी सरकारवर टीका करत पोलिसांनी फेक एन्काऊंटर केल्याचं म्हटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच अक्षय शिंदे याच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले असून शवविच्छेदन अहवालामध्ये याचा खुलासा झाला आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलीसांना सुपूर्द करण्यात आला आहे.
अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. डोक्यात लागलेल्या गोळीमुळे अती रक्तस्त्राव झाला. अक्षय शिंदेचे सात तास शवविच्छेदन सुरू होतं. संपूर्ण शवविच्छेदन प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे.
अक्षय शिंदेचे सात तास शवविच्छेदन सुरू होते. पाच डॉक्टरच्या पॅनलने शवविच्छेदन केलं. पोलीसांच्या म्हणण्यानुसार, बदलापूर पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होता. त्यामुळे तपासासाठी ठाणे क्राईम ब्राँचची टीम तळोजा कारागृहात ट्रान्सपर वॉरंटसह आली. संध्याकाळी चार वाजता पोलिसांनी अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजता तळोजा जेलमधून आरोपी अक्षय शिंदेला घेऊन ठाण्याकडे निघालो. व्हॅनमध्ये संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजीत मोरे, हरिश तावडे हे पोलीस अधिकारी होते.
यामधील संजय शिंदे हे ड्रायव्हरशेजारी तर निलेश मोरेंसोबत दोन पोलीस आरोपीच्या शेजारी बसले होते.रस्त्यात जात असताना आरोपी अक्षय शिंदे शिवीगाळ करू लागला आणि मला जाऊ द्या असं म्हणू लागला. त्यानंतर निलेश मोरे यांनी संजय शिंदेंना फोन करून सांगितलं. संजय मोरे हे स्वत: आरोपी अक्षयच्या समोर बसले होते. अक्षय शिवीगाळ करत होता, सहा ते सव्वा सहा वाजता पोलीस व्हॅन मुंब्रा-बायपास रोडवर आल्यावर आरोपीने निलेश मोरेंच्या जवळील पिस्तुल तो खेचू लागला. दोघांमध्ये झटापट झाली, त्यावेळीच पिस्तुल लोड होऊन एक गोळी फायर झाली, यामध्ये निलेश मोरे जखमी झाली ही गोळी त्यांच्या मांडीला लागली. अक्षयने पिस्तुल स्वत:कडे घेत संजय शिंदे आणि हरिश तावडे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या दोन्ही गोळ्या पोलिसांना लागल्या नाहीत यादरम्यान संजय शिंदे यांनी अक्षयवर एक गोळी झाडत त्याला जखमी केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयात आणले तिथल्या डॉक्टरांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.