प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : दिनांक 27 - रिपब्लिकन गोल्डनमन म्हणून प्रसिद्ध असणारे रिपब्लिकन पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांचे आज पहाटे डोंबिवलीतील लोटस रुग्णालयात वयाच्या 63 व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी आणि बहीण असा परिवार आहे. अंकुश गायकवाड हे अत्यंत प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते होते.दिलदार ईमानदार गोल्डनमन अंकुश गायकवाड हे वीनम्र स्वभावाचे सोन्या सारखा माणूस होता त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची ; रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत अंकुश गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
दिवंगत अंकुश गायकवाड अनेक वर्ष रिपब्लिकन पक्षात केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिले.अंकुश गायकवाड यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच संपूर्ण मुंबई ठाणे प्रदेशात रिपब्लिकन चळवळीत दुःख हळहळ व्यक्त करण्यात आली.कल्याण डोंबिवलीत रिपब्लिकन चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला अशी शोककळा डोंबिवलीतील रिपब्लिकन चळवळीत पसरली.दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या पार्थिवावर आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता डोंबिवलीत स्मशानभूमीत बौध्द पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या अंत्ययात्रेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस गौतम सोनवणे; जेष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे ,पँथर नेते दयाल बहादुरे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव माजी नगरसेवक नाना पवार ,माणिक उघडे ,किशोर मगरे सिद्धार्थ रणपिसे ,बाळकृष्ण गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंकुश गायकवाड यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच ना.रामदास आठवले यांनी शोकांदेश पाठविला असून येत्या दिनांक 29 सप्टेंबर रोजी ना.रामदास आठवले हे दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या डोंबिवलीतील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.