"पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी हरियाणा येथे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व"
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
आज महाराष्ट्रातील तरुण पिढी विविध क्षेत्रात आपले प्राविण्य मिळवत आहे. यामध्ये रायगड मधील तरुण सुद्धा पाठी नाहीत. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा चेंबूर येथे ऑगस्टमध्ये झाली होती यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पॉवरलिफ्टर सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये आदित्य अनंत घरत याने गोल्ड मेडल पटकावले. 13 सप्टेंबर 2024 रोजी हरियाणा येथे नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आदित्यला मिळाली आहे.
आदित्यने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मा.आमदार श्री.बाळाराम पाटील, मा.नगराध्यक्ष श्री जे.एम. म्हात्रे, कृ.उ.बा.स. सभापती श्री.नारायणशेठ घरत, पनवेल पं.स.सभापती श्री.काशिनाथ पाटील,शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार श्री.अतुल म्हात्रे, शेकाप रा.जि. खजिनदार श्री.प्रितम ज.म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू आणि शेकाप महिला आघाडी यांनी सन्मान करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.