.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुरातील आराम कॉर्नर परिसरात हातगाडी लावण्याच्या कारणातुन इम्रान इमाममुद्दीन मुजावर (वय 35.रा.आराम कॉर्नर) याचा मंगळवार दि.17/09/2024 रोजी रात्री आठच्या सुमारास प्लाझा टेलरच्या दुकानासमोर त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,आराम कॉर्नर परिसरात इम्रान मुजावर किरकोळ कटलरी साहित्याचे दुकान लावून विक्रीचा व्यवसायात करीत होता.त्याला लागूनच हल्लेखोर याचे नातेवाईक पर्स विकण्याचा व्यवसाय करीत असत.सोमवार (दि.16) रोजी हातगाडी लावण्यावरुन इम्रान मुजावर याचा एका महिलेशी वाद झाला होता.याचा जाब विचारण्यासाठी संशयीत हल्लेखोर युसुफ अलमसजीत (दाजी) याने इम्रान फोन करून कुठे आहे मी भेटायला येणार असल्याचे सांगितले असता त्याच परिसरात असलेल्या टिव्ही दुकानच्या दारात बसल्याचे सांगताच हल्लेखोर समोरुन येताच युसुफ याने इम्रानला मिठ्ठी मारत अचानक चाकूने इम्रानच्या छातीवर आणि दंडावर जोरात वार केल्याने त्यातच इम्रान गंभीर जखमी झाल्याने इम्रानला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी वाहनातुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.या खूनाची माहिती पोलिसांनी घटना स्थळी माहिती घेतली.संशयीत युसुफ अलमसजीत (दाजी) याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे .मयत इम्रान हा अविवाहित असून त्याच्या पश्च्यात आई आणि तीन बहिण असल्याचे समजते.इम्रान याच्या खूनाची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवारानी मोठी गर्दी केली होती.
अख्खं पोलिस डिपार्टमेंट गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात असताना या खुनाची माहिती समजताच जुना राजवाडा पोलिसांनी संशयीताची माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतले.