प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील केर्ली फाटा येथे बुधवार (दि.11) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास समोरा समोर झालेल्या मोटारसायकलच्या धडकेत प्रफुल्ल प्रकाश कुलकर्णी (वय 19.रा.शिराळा,सांगली )आणि त्याचा मित्र याच्यासह सुहास वसंत कांबळे (वय 39.रा.केर्ली) आणि त्यांची पत्नी सौ.राधिका सुहास कांबळे (वय 35) असे चौघेजण जखमी झाले असून यातील प्रकाश कुलकर्णी याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्या तिघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की,केर्ली येथील सुहास कांबळे हे पत्नी आणि लहान मुलासमवेत कामानिमित्त मोटारसायकल वरुन कामा निमित्त कोल्हापूरला गेले होते परत येताना केर्ली फाटा येथे शिराळा येथून प्रफुल्ल प्रकाश कुलकर्णी हा आपल्या मित्राला सोडण्यासाठी मोटारसायकल वरुन जात असताना केर्ली फाटा येथे समोरुन येत असलेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने चौघेही जखमी झाले आहेत.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.