प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिरोली एमआयडीसी परिसरात असलेल्या महिंद्रा कुरिअर मध्ये घरफोडी करून चोरी केल्या प्रकरणी त्याच कंपनीतील कामगार पंकज कुंतीलाल कल्याणकर (वय 23 रा.आर.के.नगर ,पाचगाव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
अधिक माहिती अशी की, शिरोली एमआयडीसी परिसरात महिंद्रा कुरीयर नावाचे ऑफिस आहे.या ऑफिसात घरफोडीचा प्रकार घडला होता.या गुन्हयांची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली होती.
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांनी तपास करीत असताना ही चोरी त्याच कंपनीत नोकरीस असलेल्या कामगाराने केल्याची माहिती मिळाली त्याला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हयांची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्याकडुन तीन लाख सहा हजार रुपये जप्त करून त्याला पुढ़ील तपासासाठी शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर , राम कोळी,सागर माने सोमराज पाटील,लखन पाटील,शुभम संकपाळ आणि परशुराम गुजरे यांनी केली.