प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुर जिल्ह्यातील तरुण मंडळानी गणेशोत्सव साजरा करताना उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा सन्मान राखून गणेशोत्सव साजरा करुन या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी.पोलिस प्रशासनाने ही कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात ही मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तसेच गणेशोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून काहीना नोटीस ही लागू केल्या आहेत.असे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी माहिती दिली.
या वेळी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पारंपारिक वाद्या बरोबरच ध्वनीक्षेपण याच्यावर ही पोलिस प्रशासनाचे लक्ष असेल.या बाबतीत सर्व मंडळाना अगोदरच सूचना दिल्या आहेत.याचे उल्ल्ंघन केल्यास संबंधित मंडळाबरोबर कार्यकर्ते यांच्यावर सुध्दा कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना प्रभारींना दिल्या आहेत.
गणेशोत्सव सणाच्या निमीत्ताने समाजकंटकावर करडी नजर असून संवेदनशील भागात पोलिस प्रशासनाच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन,रुट मार्च,संचलन या बरोबरच दंगल काबु प्रात्यक्षिके राबविण्यात आली आहेत.गणेश विसर्जन मिरवणूकीत हिडीस फिडीस अश्लिल हावभाव असलेले नृत्य टाळावे .त्याच प्रमाणे डोळ्याला इजा होईल असे लेसर बिम टाळण्याच्या सूचना दिल्या.या मिरवणूकीत वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांची फौज तैनात केल्याचे या वेळी सांगितले.
या वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस निरिक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.