प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - एमडी ड्रगची (अंमली पदार्थ) वहातुक करून विक्री केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने समीर उर्फ साजन उर्फ पाबलो (वय 31.रा.नाना पाटीलनगर) आणि मनिष नागोरी (रा.सांगलीनाका ,इंचलकरंजी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील 12 gm.वजनाचा 15 लाख 51 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा साठा करून विक्री करीत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुशंगाने तपास करीत असताना शुक्रवार(दि.13) रोजी संकल्प सिध्दी परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत ग्रे कलरच्या गाडीतुन एक इसम एमडी ड्रगची वाहतूक करून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून ग्रे कलरची गाडी येत असताना सदरची कार अडवून कारची तपासणी केली असता त्यात 12 gm.वजनाचा एमडी ड्रग हा अंमली पदार्थ मिळून आला .सदरचा ड्रग पोलिसांनी जप्त करून 15 लाख 51 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली.या वेळी त्याच्याकडे अधिक माहिती घेतली असता त्याने इंचलकरंजी येथील सांगली नाका परिसरात रहात असलेल्या मनिष नागोरी यांच्या कडुन विक्री साठी घेतल्याची माहिती दिली असता पोलिसांनी तात्काळ मनिष नागोरी याला ही अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस महेश गवळी,अशोक पवार ,अमित सर्जे ,महेंद्र कोरवी आणि विनोद कांबळे आदीनी केली.