प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - इस्लामपूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद असलेला आणि जन्मठेपेच्या शिक्षेतील फरारी आरोपी अरुण मारुती घेवडे (रा.सध्या यशवंत कॉलनी कबनूर .मुळ गाव आवंढ़ी,ता.शिराळा जि.सांगली ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याला पुढ़ील तपासासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की,फरारी आरोपी कोल्हापूर येथे कंळबा जेल मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.सदरच्या आरोपीला 2 जून 21 ते 28 मे 22 प्रर्यत रजा मंजूर झाल्याने तो रजेवर गेला होता.या कालावधी नंतर कंळबा जेल मध्ये हजर होणे आवश्यक असताना तो हजर न होता त्या दिवसापासून फरारी होता.पोलिसांनी याचा शोध घेऊन ही मिळून येत नसल्यामुळे कारागृह प्रशासनाने फरारी अरुण घेवडेच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.सदरचा आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर आला होता.
दरम्यान पोलिस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील फरारी आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारीना दिल्या होत्या.या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने फरारी आरोपीचा शोध घेत असताना त्यांना इस्लामपूर पोलिस ठाण्यात खूनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फरारी आरोपी अरुण घेवडे हा वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे रहात असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी शनिवार दि.14/09/2024 रोजी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेऊन त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा. महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पोलिस महेश पाटील,सागर चौगुले,संजय कुंभार आणि प्रशांत कांबळे यांनी केली.