गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात पारंपारिक वाद्याच्या जल्लोषात स्वागत.

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात पारंपारिक वाद्याच्या जल्लोषात कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात ही शनिवारी मंगलमुर्तीचे उत्साही वातावणात घरोघरी बरोबरच सार्वजनिक मंडळानी आगमन झाले.अधुन मधुन पावसाच्या सरी  बरसत  होत्या.सकाळ पासूनच रंगी बेरंगी  कपडे घालून बाल चमू बाप्पाला घरी आणण्यासाठी तयारीत होते.


पापाची तिकटी कुंभार गल्ली,शाहुपुरी कुंभार गल्ली येथे गणपती बाप्पाची मुर्ती आणण्यासाठी लगबग सुरु होती.काही ठिकाणी सकाळ पासून सहकुंटुंब गणेशमर्ती नेण्यासाठी आपल्या वाहना समवेत आले होते.बाजार पेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या.दुपारच्या पुढ़े सार्वजनिक मंडळाच्या कार्यर्त्यानी मिरवणूका सह पारंपारिक वाद्यासह साउंड सिस्टिम आवाजात गणेश मुर्तीची  प्रतिष्ठापना करण्यात आली.या गणेश मुर्तीच्या आगमनात आधुनिक ध्वनी यंत्रणा बरोबर ढ़ोल -ताशा याचा वापर करून सजविलेल्या वाहनात विराजमान झालेला गणपती बाप्पा आणि तरुणांचा उत्साह अशा वातावणात बाप्पाचे आगमन होत होते.काही तरुण मंडळींच्या मिरवणूकत पारंपारिक खेळासह लेझीम पथकात महिलाही मोठ्या प्रमाणात सामील झाल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post