पारंपारिक वाद्यांना गणेश विसर्जन मिरवणूकीत रात्री बारानंतर परवानगी द्या -- पोलीस प्रशासनाला राजेश क्षीरसागर यांच्या सूचना.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - गणेश विसर्जन मिरवणूकीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाच्या अधिन राहून रात्री बारा वाजेप्रर्यत साउंड सिस्टिमला परवानगी द्यावी.बाराच्या  नंतर  साउंड सिस्टिम बंद झालेवर मिरवणुकीत शांतता पसरते.त्यामुळे काही कार्यकर्ते मधुनच जात असल्याने त्यांचा जोश ,उत्साह रहाण्यासाठी पारंपारिक वाद्यांना नियम तपासून रात्री बारा नंतर परवानगी देण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला महाराष्ट्र नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.


तसेच गेल्या दोन तीन वर्षांपासून गणराया अवॉर्ड जो बंद आहे.तो पूर्ववत चालू कराव्यात अशी मागणी केली असता अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील यांनी कोल्हापूर आणि इंचलकरंजी येथे  या वर्षी पासून चालू करीत असल्याचे सांगितले.

  प्रथम पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बैठकीची माहिती दिली.त्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे - पाटील यांनी स्वागत केले.उपस्थित असलेल्या गणेश मंडळाला काही अडचणी,सूचना असल्यास पोलिस प्रशासनास     मांडण्याच्या सूचना दिल्या.काही मंडळाच्या कार्यकर्त्यानी रात्री बारा नंतर पारंपारिक वाद्यांना परवानगी देण्याची मागणी केली.तर एका मंडळाच्या कार्यकर्ता यांनी गणेशउत्सवात किरकोळ कारणासाठी कार्यकर्त्यावर दाखल होत असलेल्या गुन्हयांमुळे पासपोर्ट किंवा नोकरीसाठी येणारा अडथळा याचा विचार करून नियमात बदल करण्याची मागणी केली असता पोलिस प्रशासनाने यावर माहिती घेऊन सांगत असल्याचे क्षीरसागर यांना सांगितले.शहर पोलिस अधीक्षक अजित टिके यांनी गणेश उत्सव काळात महिला ,मुली मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी येत असतात.त्यांना कोणी त्रास देत नाही याची काळजी घ्यावी.तसेच उपद्रवीना तेथे येऊ न देण्याच्या सूचना दिल्या.जर कोणी  ऐकत नसेल तर आंंम्हांला माहिती कळवा आम्ही आमच्या पध्दतीने त्याचा बंदोबस्त करु.असे सांगून काय वाटल्यास आपण तात्काळ 112 हा नंबर डायल करावा .चौथ्या मिनटाला पोलिस प्रशासन हजर असेल असे या वेळी सांगितले.अप्पर पोलिस अधीक्षक निकेश पाटील यांनी ही सूचना देऊन गणेश उत्सव मंडळानी नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करावा.आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,निकेश खाटमोडे पाटील,पोलिस उपअधीक्षक अजित टिके,लक्ष्मीपुरीचे दिलीप पवार शाहुपुरीचे अजयकुमार सिंदकर ,राजवाडाचे संजीव झाडे,राजारामपुरीचे सुशांत चव्हाण आणि शहर वहातुक शाखेचे अनिल तनपुरे यांच्यासह तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post