प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - बेकायदेशीर रित्या गुरुवार दि.05/09/2024रोजी गांजा जवळ बाळगुन त्यांची विक्री करीत असल्या प्रकरणी रोहित राम चव्हाण (वय 33.रा.सोमवार पेठ,घिसाडगल्ली) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवार पेठ परिसरात असलेल्या आपले तरुण मंडळ येथे नवीन घराचे बांधकाम चालू आहे.येथील एका झाडाच्या आडोशाला रोहित चव्हाण हा उघड्यावर गांजाची विक्री करीत असल्याची लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी तेथे जाऊन रोहित चव्हाण हा गांजाची विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील बावीस हजार चारशे रुपये किमंतीचा 578gm. वजनाचा गांजासह एक मोबाईल आणि लहान वजन काटा जप्त करून त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.