कोल्हापुरातील सीआयडीचे काम समाधानकारक - गुन्हें अन्वेषन राज्याचे प्रमुख प्रशांत बुरडे यांचे प्रतिपादन..

 


 प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापुरातील गुन्हें अन्वेषनने दुसर्या जिल्हयातील दाव्यांची चौकशी आणि त्यावरून दाखल केलेल्या गुन्हयांचा सखोल तपास केल्याने कोल्हापूर विभागाचे काम खूपच समाधानकारक असल्याचे गुन्हें अन्वेषण विभागाचे राज्याचे प्रमुख प्रशांत बुरडे यांनी सांगितले.ते नवीन इमारतीत स्थलांतरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

या वेळी पोलिसांच्या पाल्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यांनी तपास करीत असताना आपले अनुभव सांगताना मुंबई येथे काम करीत असताना मी फ़ेटाच विसरुन गेल्याचे सांगितले.काही गुन्ह्यातील आरोपी कित्येक वर्षे फरार आहेत म्हणुन त्याचा तपास थांबवायचा नसतो.काही आरोपी गेल्या सतरा वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीस हैदराबाद येथून ताब्यात घेतले तर सोळा वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीस दिल्लीतुन ताब्यात घेतल्याचे सांगितले.त्यांनी सीआयडीचा वेगळा अर्थ सांगितला सी म्हणजे शिवाजी साठम डी म्हणजे दया असा उल्लेख केल्याने उपस्थितीत हास्याचे फवारे उडाले.त्यांनी राकेश मारीया यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याचे समाधान व्यक्त केले.

सीआयडीचे कार्यालय सध्या शनिवार पेठेतील नगरभूपान ऑफिसच्या माडीवर होते.ते आता कं.बावडा रोडवर असलेल्या ड्रिम वर्ड़ येथील समोरील शासकीय इमारतीत स्थलांतर झाले.हे ऑफिस लहान असल्याने कामकाजाच्या दृष्टीने पोलिस अधिकारी यांना काम करीत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता.नवीन कार्यालय होण्यासाठी येथे येणारा नवीन अधिकारी पुढ़ाकार घेत नव्हते.कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षक दुबुले यांनी या विभागाची सुत्रे हाती घेतल्या पासून तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि सध्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून कं.बावडा येथे ड्रीम वर्ड़च्या समोर असलेली शासकीय  इमारतीची जागा निश्चित केली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारयांकडे पाठपुरावा करुन आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करून घेतल्या.

या कार्यक्रमाला विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुल्लारीसो ,पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत, इतिहास संशोधक  जयसिंगराव पवार,अजित भिमराव दुबुले ,योगेश शिंदे,लाचलुचपत विभागाच्या पोलिस अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यासह या पथकातील अधिकारी ,निरीक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी मनिषा दुबुले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.आभार पोलिस निरीक्षक वर्षा कावडे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post