कारने दिलेल्या धडकेत रिक्षा चालक ठार.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - गडहिग्लज तालुक्यातील शेंद्री येथील सदाशिव बाबू फ़ेगडे (वय 42) यांचा शुक्रवार ( दि.13) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास औरनाळ फाटा येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी साडे नऊच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत सदाशिव फ़ेगडे रिक्षा चालक असून ते संकेश्वरहून गडहिग्लजच्या दिशेने जात होते.त्याच वेळेस गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने जात असलेली होंडा कार याची रिक्षाला जोराची धडक बसून हा अपघात झाला.या घटनेची माहिती गडहिग्लज पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना येऊन पंचनामा करून अपघातातील कारसह कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.त्यांच्या पश्च्यात आई वडील,पत्नी व दोन मुले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post