"गणपती बाप्पा मोरया,पुढ़च्या वर्षी लवकर या "च्या गजरात मोठ्या उत्साहात बाप्पांना निरोप.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - उत्साही आणि चैतन्य  वातावरणात पारंपारिक वाद्याच्या कोल्हापूर वासियांच्या मोठ्या उत्साहात साऊंड सिस्टिमच्या दणदणाटांत गणपती बाप्पा मोरया आणि पुढ़च्या वर्षी लवकर या "च्या गजरात भक्तीभावात बाप्पांना मंगळवारी निरोप देण्यात आला.

प्रथम मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मुर्तीचे उपस्थित मान्यंवराच्या हस्ते पुजन करून ढ़ोल ताशाच्या गजरात मिरवणूकीस सुरुवात झाली.या मिरवणूकीत विविध मंडळे झांजपथक ,लेझिम ,ढ़ोल ताशा आदी पारंपारिक वाद्याच्या गजर,अनेक महिला व पुरुष आकर्षक पोशाख करून सहभागी झाले होते.काही ठिकाणी किरकोळ वादा वादीचे प्रंसग वगळता मिरवणूक शांततेत पार पडली.या पोलिस बंदोबस्त ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.रात्री बाराच्या पुढ़े पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या सुचने नुसार सर्व सांऊंड सिस्टिम बंद करण्यात आल्या होत्या.ही मिरवणूक चोवीस तास चालू होती.पापाची तिकटी येथे पहाटे साडेचारच्या सुमारास शहिद भगतसिंग फ्रेंडस् सर्कल आणि व्हाइट आर्मीच्या गणेश मुर्तीची पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या हस्ते आरती करण्यात आली.सकाळी आठच्या सुमारास  इराणी खण येथे शेवटच्या गणेश मुर्तीचे विसर्जन झाले.या वेळी कोल्हापुर महानगरपालिकेच्या आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पोलिस प्रशासनाने मिरवणूकीची दोन तीन महिने अगोदरच योग्य नियोजन केले होते.महत्वाचे मार्ग येण्या जाण्यासाठी अलग केल्यामुळे गर्दीला काबू करता आले.या मिरवणूक मार्गावर 2500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलिसांनी मिरवणूकीत सर्वसामान्य लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती.

पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,शहर उपअधीक्षक अजित टिके,करवीरचे सुजितकुमार क्षीरसागर,जिल्हा शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांच्यासह सर्वच पोलिस ठाण्याचे प्रभारी बंदोबस्तात मिरवणूक संपेप्रर्यत होते.

Post a Comment

Previous Post Next Post