संकटाच्या काळात जे सोडुन निघुन गेले त्यांना सगळं काही दिले त्यांना त्यांची जागा दाखविणार .खा.शरद पवार.

  राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षात समरजित घाटगे यांचा प्रवेश.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कागल येथे कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते समरजित घाटगे यांनी  भाजपला राम राम देत मंगळवार (दि.03) रोजी गैबी चौकात आयोजित केलेल्या पक्ष प्रवेशाचे निमीत्त साधुन पक्षाध्यक्ष शरद पवार बोलत होते.ते पुढ़े म्हणाले कागलची जनता लाचारीची नाही.तर स्वतःचा स्वाभिमान जपणारी आहे.संकटाच्या काळात जे सोडुन निघुन गेले त्यांना सगळं काही दिले,त्यांना त्यांची जागा दाखवून समरजित घाटगे यांना निवडून द्या.त्यांना मंत्री करणारच असे म्हणताच कार्यक्रर्यात,नागरिकांच्यात उत्साह पसरुन टाळ्यांचा कडकडाट झाला.


दिवसभरात पावसाच्या सरी बरसत होत्या.सायंकाळी सभा सुरु झाल्या नंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली.यामुळे सभेत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.या सभेच्या ठिकाणी मंडप घातलेला नसल्याने सभा उघड्यावर पार पडली.

समरजित घाटगे यांनी भाषणाला सुरुवात करताच सभेत टाळ्यांचा कडकडाट होऊन त्यांचे स्वागत झाले.समरजित घाटगे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आता परिवर्तनाची गरज असल्याचे सांगून आज शुभारंभ करण्याचा योग जुळून आल्याचे सांगितले.हा गैबी चौक म्हणजे साक्षात वस्ताद शरद पवार यांचीच जागा असल्याचे सांगितले.समरजित घाटगे यांनी भाषणात नाव न घेता पाच वेळा मंत्री झालेल्याच्यांकडे केंद्र व त्यांच्या गटा बरोबर राज्याची सत्ता आहे.पण माझ्याकडे जनतेची ताकद आणि शरद पवार आहेत.आता "तुतारी सगळीकडे गावागावात पोहचविण्याचे आवाहन करत शक्तीपीठ रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

समरजित घाटगे यांच्या भाषणा वेळी अजान सुरु झाल्याने घाटगे यांनी आपले भाषण थांबविले.या वेळी सभा स्थळी शांतता पसरली होती.

या वेळी पक्षाध्यक्ष मा.शरद पवार,प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील,नंदाताई बाभुळकर,व्ही.बी.पाटील,उत्तम जानकर ,सुहासिनी घाटगे ,आर.के.पोवार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post