आयशर टेम्पोने मोटार सायकल स्वारास उडविले.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - गगनबावडा तालुक्यातील गोरिवडे येथे रहात असलेले सचिन रामचंद्र वडाम (वय 29) यांचा बुधवार (दि.11) रोजी दुपारा पावणे पाचच्या सुमारास बावेली नदीच्या कॉर्नरवर झालेल्या अपघातात गंभीर  जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढ़ील उपचारासाठी 108 या रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना शनिवार दि.14/09/2024 रोजी साडे आठच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत सचिन हा रहात असलेल्या गावातील ग्रामपंचायतीत रोजगार  सेवक म्हणून कामास होता.त्या दिवशी ग्रामपंचायतला लागणारे मटेरियल आणण्यासाठी आपल्या मोटारसायकल वरुन जात असताना बावेली नदीच्या कॉर्नरला सर्व्हिसिंग साठी आलेल्या आयशर टेम्पोने मोटारसायकल स्वारास उडविल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला होता.त्याला तात्काळ त्याच्या नातेवाईकांनी आणि त्या गावच्या लोकनियुक्त संरपच सौ रेश्मा अंकुश परिट यांच्यासह ग्रामस्थांनी जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.दरम्यान गगनबावडा पोलिसांनी अपघातातील आयशर टेम्पो जप्त करून चालकाला ताब्यात घेतल्याचे समजते.या चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याची माहिती मिळाली.

Post a Comment

Previous Post Next Post