केंद्रींय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त.

 वाहतूक मार्गात  बदल करून पोलिसांची  रंगीत तालीम .

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीसांनी योग्य नियोजन केले आहे. मंगळवारी सकाळी पोलिसांनी दौरा मार्गावर रंगीत  तालीम घेतली. तसेच बंदोबस्तातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी सुचना केल्या आहेत. ना.शाह हे ज्या मार्गावरून जणार आहेत. तेथील वाहतूक मार्गातही बदल केले आहेत.

करवीर निवासीनी अंबाबाई देवीचे दर्शन त्याचबरोबर अन्य दोन शासकीय नियोजीत कार्यक्रमांना ना.शाह हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलीसांनी विमानतळापासून ते त्यांच्या दौऱ्या मार्गावर चोख बंदोबस्त नेमला आहे. या बंदोबस्ताची संपूर्ण तयारी पोलीस अधीक्षकांनी केली आहे. प्रत्येकाला आपले पॉईट फिक्स केले आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेलाही या बाबतच्या सूचना दिल्या आहेत.

    या बंदोबस्तात पोलीस अधीक्षक १, अप्पर पोलीस अधीक्षक २, पोलीस उपअधीक्षक ८,पोलीस निरीक्षक १९,पोलीस उपनिरीक्षक ७५, पोलीस कर्मचारी ६५०,वाहतूक शाखा ८५ कर्मचारी, होमगार्ड १५०, राज्य राखीव दलाची तुकडी, बॉम्ब शोधक पथक असा बंदोबस्त नेमला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post