प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हरिओमनगर परिसरात असलेल्या कोतवाल नगर येथे बांधकामावरुन पाय घसरून पडल्याने बांधकावरील सळी मानेत घुसून आनंद मिश्रा (वय 27.रा.लेबर क्यम्प,मुळगाव जोधपूर ) हा जागीच ठार झाला.ही घटना मंगळवार दि.23/09/2024 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली असून त्याला त्याच्या नातेवाईकांनी मानेत अडकलेल्या सळीसह 108 या रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,कोतवालनगर येथे बांधकामाची साइट चालू असून त्या बांधकामाचा ठेकेदार विनोद राठोड यांच्याकडे तिघेजण बिहारी कामगार कामास आहेत.यातील मयत आनंद मिश्रा याने आज सुट्टी घेतली होती.त्याचा साथीदार आणि आनंद मिश्रा बांधकामावरील पहिल्या मजल्यावर बोलत बसले होते.ते खाली आल्यानंतर मोबाईल विसरल्यामुळे आणण्यासाठी पहिल्यावर गेला असता तो खाली उतरत असताना त्याचा पाय घसरून पडल्याने तेथील सळी त्याच्या मानेतुन आरपार जाऊन त्याचा मृत्यु झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.