पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील यळगूड येथे झालेल्या टायर दुकान चालक गिरीशकुमार विश्वनाथ पिल्लई (वय 47.रा.मुळगाव केरळ) याचा खून केल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह आरोपी नचिकेत विनोद कांबळे (वय 19.रा.शाहुनगर ,हुपरी )याला स्थानिक गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या पोलिसांनी आणि हुपरी पोलिसांनी एकत्रितपणे तपास करून अवघ्या 24 तासात अटकेली.अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील,पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे व पोलिस निरीक्षक एन.आर.चौखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घटना स्थळावरुन समजलेली माहिती अशी की,गुरुवारी रात्री आठच्या सुमारास नचिकेत कांबळे हा एका अल्पवयीन मुलासह आपल्या मोटारसायकल वरुन यळगूड येथे जात असताना त्याच्या दुचाकीच्या पुढ़च्या चाकात हवा कमी असल्याने तो जवाहर कारखाना येथे असल्येल्या पंक्चर काढ़ण्याच्या टायर दुकानात हवा भरण्यासाठी गेला.हवा भरुन झाल्यानंतर पैसे देण्यासाठी नचिकेतकडे सुट्टे पैसे नसल्याने पाचशे रुपयांची नोट दिल्याने या कारणातुन मयत पिल्लई आणि नचिकेत यांच्यात वाद होऊन शिवीगाळ करुन मारहाण झाली.या वेळी रागाच्या भरात नचिकेत यांने त्याच दुकानातील लोंखंडी टॉमी घेऊन पिल्लई याच्या डोक्यावर व कपाळावर मारल्याने रक्तबंबाळ होऊन पिल्लई खाली पडला.त्या वेळी अल्पवयीन मुलाने त्याच्या जवळ असलेल्या सुरीने पोटात दोनदा वार केल्याने पिल्लई याचा जागीच मृत्यु झाला.पोलिसांनी अत्यंत आपल्या कौशल्याने तपास करून एका अल्पवयीन मुलासह नचिकेतला ताब्यात घेतले .सुट्ट्या पैशाच्या कारणातुन खून झाल्याने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त केली जात आहे.