प्रेस मीडिया लाईव्ह :
अर्जुन धुमाळे :
कोल्हापुर , इचलकरंजी (हातकणंगले ) येथील श्री बालाजी बालमंदिर शाळेतील उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ रंजना सुर्यकांत घोरपडे यांना स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन यांच्या महाराष्ट्र तर्फे राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धा 2023 मध्ये आयोजित केली होती. या मध्ये॓॓ नवसाधन वापरु चला, आनंददायी शिक्षण घेऊ चला.या त्यांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.
सोलापुर येथे शनिवार दिनांक 31/08/2024 रोजी आयोजित झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सारथी शिष्यवृत्ती चे प्रमुख श्री अशोक काकडे IAS यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध साहित्यिक संजय जगताप,सकाळचे सोलापूर जिल्ह्याचे संपादक श्री अभय दिवाणजी, श्री योगेश सोनावणे, बालभारती चे सदस्य श्री अजितकुमार लोळगे,सर फाऊंडेशन चे संयोजक श्री बाळासाहेब वाघ, श्री सिध्दराज माशेळे आणि श्री रविकिरण चव्हाण आदींच्या उपस्थितीत सौ रंजना सुर्यकांत घोरपडे यांना सन्मानित करण्यात आले.
या नवोपक्रमाची राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी नवनवीन साहित्यिक उपक्रमाची व कल्पनांचा वापर करून नाविण्यपूर्ण शिक्षण सर्व घटकांना व्हावी यासाठी तयार केलेल्या शैक्षणिक साधनांची दखल घेतली व सौ रंजना सुर्यकांत घोरपडे यांना पुरस्कृत केले या बद्दल त्यांच्या उत्तुंग यशासाठी साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत आहे.*मराठी एस न्यूज साठी अर्जुन धुमाळे*