प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - गडहिग्लज परिसरात असलेल्या वडरगे रोडवर योगेश हरि सांळुखे (रा.गरदेनगर ) याचे सोमवार (दि.23) रोजी अपहरण करून खंडणीची मागणी केली होती.या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आणखी दोघांना अटक केली.प्रविण विलास मोहिते (वय 29.रा.राजारामपुरी 14 वी गल्ली,को.) आणि लखन बाळकृष्ण माने (वय 35.रा.मंगेश्वर कॉलनी,उचगाव ) अशी त्याची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की,योगेश सांळुखे यांचे त्याच्याच मित्रानी जेवायला जाऊया असे म्हणत त्याच्याच मोटारीतुन अपहरण करून त्याला कमरेच्या पट्टयाने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन व हाताच्या बोटातील दिड तोळ्याची अंगठी जबरदस्तीने काढ़ुन घेऊन वीस लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने योगेश याने बुधवार(दि.25) रोजी आपल्या मित्रासह अनोळखी चार ते पाच जणांच्या विरोधात गडहिग्लज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.गडहिग्लज पोलिसांनी ओंकार दिनकर गायकवाड (रा.हणमंतवाडी ,गडहिग्लज), सुनिता उर्फ शनया प्रकाश पाटील (रा.बाळेघोल,ता.कागल)आणि विरेंद्र संजय जाधव (रा.रांशिग ,ता.हुक्केरी) या तिघांना गुरुवार(दि.26) रोजी अटक केली होती.यातील आणखी आरोपी फरार होते.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांनी गुन्ह्याची माहिती घेत तपास करीत असताना या गुन्हयांत सामील असलेले दोघे जण उचगाव येथे असलेल्या हायवे ब्रिज येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा लावला असता त्या ठिकाणी दोघे इसम मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानी आपली नावे प्रविण मोहिते व लखन माने असल्याची माहिती दिली.त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार तोळ्याची सोन्याची चेन आणि दिड तोळ्याची अंगठी मिळाल्याने ती पोलिसांनी जप्त करून या बाबत चौकशी केली त्यांनी गुन्हयांची कबुली दिली.या दोघां आरोपीना पुढ़ील तपासासाठी गडहिग्लज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,गडहिग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा.उपनिरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस संतोष बर्गे,परशुराम गुजरे ,वैभव पाटील ,महेंद्र कोरवी ,योगेश गोसावी आदीनी केली.