वाघ आल्याचे महिलेच्या एका कॉलने प्रशासनाची तारांबळ. शेवटी अफवाच.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील एका कॉलेजमधून वाघ आल्याचे एका  महिलेने फोन केला. साहेब कॉलेजमध्ये वाघआलाय..लवकर या. या फोनमुळे पोलीस प्रशासनासह  वनविभाग आणि अग्निशमन दल तातडीने  घटना स्थळी दाखल झाले. कॉलेजचा परिसर पिंजून काढला मात्र वाघ सापडला नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

अधिक माहिती अशी की , सोमवारी दुपारी एका कॉलेजमधील महिलेस वाघाची डरकाळी ऐकण्यास आली. त्यामुळे महिलेने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस, वनविभाग व अग्निशमन दलाचा बंब यांना घेऊन कॉलेजमध्ये गेले. कॉलेजला सुट्टी देऊन मुलांना घरी पाठवले. त्यानंतर संपूर्ण परिसरात तपासणी केली. पण वाघ कुठेच नव्हता. ही केवळ अफवा होती.या  गैरसमजूतीतून हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. पण वाघ आला नसल्याचे समजल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

-----------

 घराला शॉर्ट सर्किटने आग.

कोल्हापूर : फुलेवाडी येथील एका कौलारू घराला शॉर्ट सर्किटने आग लागून यात फ्रीज, कपडे, प्रांपचिक साहित्य जळाले. या घटनेची माहिती मिळताच  तात्काळ अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले  जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. यावेळी वरच्या मजल्यावर अडकलेल्या दोन महिलांची जवानांनी सुटका केली. या आगीत ५० हजारांचे नुकसान झाले.

----------------

  सुतार काम करताना ग्रायंडर लागून कामगार जखमी

कोल्हापूर : शहरातील एका कॉलेजमध्ये सुतारकाम करत असताना ग्रायंडर लागून केशव खेडू यादव (वय ३८, रा. उचगाव, ता. करवीर) हा कामगार जखमी झाला. सोमवारी दुपारी साडे चार वाजता हा प्रकार घडला. जखमीला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

-------

मारहाण प्रकरणी तिघांच्यावर गुन्हा.

कोल्हापूर : कोरीवडे, ता. आजरा गावात किरकोळ कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाणीत पती, पत्नी जखमी झाले. दि. २७ रोजी रात्री हा प्रकार घडला. शितल दत्तात्रय पाटील (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घरात घुसून हल्ला करणारे संशयित शिवाजी तुकाराम पाटील, सत्यजीत शिवाजी पाटील, सुनीता शिवाजी पाटील (रा. तिघे कोरीवडे) यांच्यावर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------

Post a Comment

Previous Post Next Post