प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कंळबा परिसरात असलेल्या आदित्यनगरात रहात असलेल्या डॉ.दिपाली सुभाष ताइंगडे यांच्या घरी चोरी केल्या प्रकरणी त्यांच्याकडे कामास असलेला प्रसाद रघुनाथ माने (वय 20.रा.सुर्वेनगर ,कंळबा ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून आठ लाख रुपये किमंतीचे 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त करून त्याला पुढ़ील तपासासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की,कंळबा परिसरातील आदिनाथनगर येथे रहात असलेल्या डॉ.सौ दिपाली सुभाष ताइंगडे यांच्या घरी आठ लाखांपेक्षा जास्त किमंतीचे 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती.हा प्रकार फ़ेब्रु.24 ते 04 एप्रिल 24.च्या दरम्यान घडला होता.याची फिर्याद त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.हा गुन्हा उघकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या.या गुन्ह्याचा तपास करीत असताना ही चोरी त्यांच्याकडे कामास असलेल्या कामगाराने केल्याची माहिती मिळाली असून तो चोरीतील दागिने गुजरी येथे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून प्रसाद माने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने चोरीची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्या ताब्यातील आठ लाखांपेक्षा जास्त किंंमंतीचे 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा.उपनिरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस वैभव पाटील,नामदेव पाटील ,विशाल खराडे,गजानन गुरव ,प्रविण पाटील,परशुराम गुजरे आणि विश्वास खराडे यांनी केली.