प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - दोघां अल्पवयीन मुलासह पोलिस रेकॉर्डवरील ट्रॅक्टर चोरटा पवन प्रकाश देसाई (वय 28.रा.कासारगल्ली ,कडगांव.ता भुदरगड ) याच्यासह त्याच्या अल्पवयीन दोघां साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून 6 लाख 50 हजार रुपये किमंतीचा अर्जुन 555 कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करून त्यांना पुढ़ील तपासासाठी ट्रॅक्टरसह भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की , वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी वाहन चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.त्यांच्या सुचने नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांनी वेगवेगळी पथके तयार करून माहिती घेत तपास चालू केला असता या पथकातील पोलिसांना पोलिस रेकॉर्डवरील पवन प्रकाश देसाई हा चोरीचा ट्रॅक्टर घेऊन विक्री साठी गारगोटी आजरा मार्गावर असलेल्या नवले येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता याची खात्री करून या पथकातील पोलिसांनी दि.19/09/2024 रोजी सायंकाळच्या सुमारास त्या परिसरात सापळा रचून पवन प्रकाश देसाई यांच्यासह त्याच्या दोघां अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा ट्रॅक्टर चोरीचा असून चार दिवसांपूर्वी भुदरगड तालुक्यातील बश्याचा भोळा आणि सुक्याचीवाडी येथुन चोरल्याची कबुली दिली.त्यांच्यावर भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्यांना पुढ़ील तपासासाठी ८ ट्रॅक्टरसह भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पोलिस प्रशांत कांबळे,राजू कांबळे ,योगेश गोसावी ,सुशिल पाटील व भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलिस महादेव मगदुम ,सागर साबणे ,परिट यांच्यासह सायबरचे सचिन बेंडखळे यांनी केली.