प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील हारपवडे येथील लक्ष्मी कृष्णात पाटील (वय 35) यानी शनिवार (दि.21) रोजी सकाळी दहाच्या सुमारास रहात असलेल्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना रविवार दि.22/09/2024 रोजी दुपारी दिडच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत यानी पाणी समजून विषारी औषध प्यायल्याने त्याची चव वेगळी वाटली असता त्यांनी बाहेर येऊन उलटी करुन चुकून विषारी औषध घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले असता हा प्रकार निदर्शनास आला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पती,एक मुलगा आणि एक मुलगी आहे.