विषारी औषध घेतलेल्या इसमाचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातील पांडुरंग आनंदा राऊत (वय 55.) यानी शुक्रवार (दि.07) रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास रहात असलेल्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्राथमिक उपचार इंचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना सोमवार दि.09/09/2024 रोजी सकाळी आठ वाजता मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

-------'--------------------------------

विषारी औषध घेतलेल्या वृध्दाचा मृत्यु.

कोल्हापूर - जुना बुधवार पेठेतील  तोरस्कर चौकातील साईनाथ  तुकाराम हावळ (वय 73) यांनी मंगळवार (दि.27 ऑगस्ट ) रोजी  मध्यरात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले होते.त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना सोमवार दि.09 सप्टेंबर रोजी रात्री दिडच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

----------------------------------------

  विहीरीत पडल्याने महिलेचा  मृत्यु.

कोल्हापूर -हातकंणगले तालुक्यातील हेर्ले येथे रहात असलेल्या चंदा बाळू कोळेकर (वय 56) ह्या रविवार( दि.08) रोजी रात्री साडे आठच्या सुमारास गडगे यांच्या घराजवळ असलेल्या विहीरीत पडल्या होत्या.त्यांच्या नातेवाईकांनी बाहेर काढ़ुन बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी रात्री सव्वा अकराच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post