आमदार ,खासदारसह प्रमुख नेते एकत्र.माजी पालकमंत्री सतेज पाटील व खा.धनंजय महाडिक एकाच मंचावर.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायंमूर्ती आणि मुख्यमंत्री यांची एकत्रीत बैठक झाल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मुख्य न्यायमुर्तींशी चर्चा करावी अशी विनंती केली जाईल. असा ठराव सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मंजूर करण्यातआला. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज होते.
आमदार सतेज पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना मुख्यमंत्री व उच्च न्यायालयचे न्यायमूर्ती यांची भेट घेतल्यानंतरच हा प्रश्नमार्गी लागणार असून त्यासाठी सहा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, खंडपीठ कृती समिती यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजीत करण्यासाठी खासदार शाहू महाराज यांनी एक पत्र तयार करून ते मुख्यमंत्र्यांना पाठवावे असे नमुद केले. तर खा. धैर्यशिल माने, खा.धनंजय महाडीक यांनी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यामंत्र्याशी चर्चा करून बैठकीची तारीख ठरवावी.असे मत व्यक्त केले.
खा.धनंजय महाडिक पुढ़े म्हणाले, कोल्हापूर खंडपीठाबाबत राजकीय अनास्था नाही.त्या साठी सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा येणारा खर्च देण्यास राज्य सरकार कटीबध्द आहे.याच्या मागणीचा एक ड्राफ्ट तयार करून लवकरच आपण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावूया.असे आपले मत व्यक्त केले.त्याच प्रमाणे खा.धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री यांच्याशी भेट घडवून हा प्रश्न शक्य तितक्या लवकरात लवकर सोडवण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेत असून याची लवकरच गोड बातमी समजेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपले मत मांडताना २०१४ साली या विषयावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. १५ ऑगस्ट,२०२४ ला मुख्यमंत्री व मुख्य न्यायमूर्ती यांची धावती भेट झाली पण या मुद्यावर चर्चा झाली नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज आपल्या अध्यक्षीय भाषणात खंडपीठाचा प्रश्न अंतिम टप्पयात आला आहे. मात्र यासाठी मुख्मयंत्री एकनाथ शिंदे व हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती यांची बैठक होऊन चर्चेतून प्रश्न मार्गी लागणार आहे. या संदर्भात खा.धैर्यशिल माने यांच्या मध्यस्थीने मी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रव्यवहार केला असून पण अद्याप पत्राचे उत्तर आले नसल्याचे सांगितले. सहा जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी व मुख्यमंत्री यांची तातडीने बैठक घेणे गरजेचे आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य न्यायमूर्ती यांची भेट घेऊन हा तिढा सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजीव आवळे, शिवसेनेचे विजय देवणे, सत्यजित कदम, जिल्हा बार असोसिएशनेचे अध्यक्ष व खंडपीठ कृती समितीचे सचिव ॲड. सर्जेराव खोत, सचिव निशिकांत पाटोळे हजर होते. सहा जिल्ह्याचे आजी माजी बारचे अध्यक्ष,पदाधिकारी हजर होते.