प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील आरडेवाडी येथील सौ.स्नेहल सागर आरडे (वय 25.रा.आरडेवाडी) या विवाहितेने सासरच्या छळास कंटाळुन गुरुवार दि.12/09/2024 रोजी दुपारी बाराच्या सुमारास रहात असलेल्या घरात छतास ओढ़णीने गळ्यास गळफास लावून घेतल्याने तिच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी पावणे दोनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत स्नेहल हिचे माहेर करवीर तालुक्यातील हसूर दु.असून तिचा विवाह आरडेवाडी येथील सागर नामदेव आरडे याच्याशी झाला होता.विवाह नंतर सागर हा पत्नी स्नेहल हिला कर्जाचे हप्ते फ़ेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार त्रास देऊन मारहाण ही करीत होता.तर दिर उत्तम नामदेव आरडे हा घराच्या प्रॉपर्टीच्या वाटणी वरुन वाद घालत शारिरीक आणि मानसिक त्रास देऊ लागल्याने या सर्वाला कंटाळुन रहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.याची फिर्याद नामदेव बापू झांझगे (वय 55.रा.हसुर दु.) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.करवीर पोलिसांनी पती सागर आरडे व दिर उत्तम आरडे या दोघांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहल हिच्या आत्महत्या केल्याची माहिती समजताच तिच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती.काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी सीपीआर रुग्णालयात येऊन मयताची माहिती घेतली.