वारणा विद्यापीठ उध्दाघाटन आणि वारणा सुवर्ण सोहळा प्रसंगी प्रतिपादन.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - वारणानगर येथे आयोजित केलेल्या वारणा महिला उद्योग समुहचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.त्यापुढ़े म्हणाले की,व्यापार आणि खाजगी उद्योग हे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका असते.त्याच प्रमाणे वारणा उद्योग समुहाचे योगदान अतुलनिय असल्याचे सांगितले.
या वेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,केंद्रींय युवा व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री हसन मुश्रीफसो,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,खा.धनंजय महाडिक ,खा.धैर्यशील माने,आ.विनय कोरे वारणा बँकेचे संचालक निपुण कोरे आणि सावित्री महिला संस्थेच्या संचालक शुभलक्ष्मी कोरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी अन्न सुरक्षा व नैसर्गिक संस्थानचे व्यवस्थापन आणि दारिद्रय निर्मूलनाचे सहकार संस्थात योगदान महत्वपूर्ण असल्याचे सांगून काळानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी ही बदलण्याची गरज आहे.या वारणा समुहाच्या कार्यक्रमात बोलताना आनंद होत असल्याचे सांगत योगदान देणारया उपस्थित महिलांचे कौतुक केले.सहकार चळवळ बळकट करण्यासाठी 2021 ला सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे.सहकारी संस्थानी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
स्व.तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार.उपमुख्यमंत्री फडणवीस .
विकासात महिलावर्गाची भागीदारी वाढ़त नाही तो प्रर्यत विकास करता येणार नाही. सहकारातुनच क्रांती घडू शकते हे लोकांनी वारणानगर येथे येऊन पहावे.स्व .तात्यासाहेब कोरे यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना पद्म पुरस्कार मिळावा या साठी शासना कडुन पाठपुरावा करण्यात येईल अशी खात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.वारणा समुहाने त्यांनी केलेल्या प्रत्येक क्षेत्रात झालेली क्रांती अंचबित करणारी आहे.3 हजार कोटीची उलाढ़ाल होत असल्याचे सांगितले.
दरम्यान वारणा समुहाचे व मा.आ.डॉ.विनय कोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात भारताचे राष्ट्रपती प्रथमच कोल्हापुर जिल्हयात आल्याचे सांगून त्यांचे आभार मानून त्यांना वारणा समुहाची माहिती दिली.या वेळी महिलांनी राष्ट्रपतीना शिवराज्यभिषेक तैलचित्र भेट दिले.सावित्री महिला संस्थेच्या संचालीका शुभलक्ष्मी कोरे यांनी राष्ट्रपती मुर्मूजी यांचे कोल्हापुरी साज आणि साडी देऊन स्वागत केले.तसेच राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आणि मा.देवेंद्र फडणवीस यांचे ही मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.