प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापूर शहरातून घरगुती पाण्याच्या पितळी मीटरची चोरी केल्या प्रकरणी प्रदिप बाळु म्हस्के (वय 24. रा.भगतगल्ली, तारदाळ) याला आणि विकत घेणारा बाळु आनंदराव गोसावी (रा.खोतवाडी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्यांच्या कडील एक लाख रुपये किमंतीचे 39 पितळी पाण्याची मीटर जप्त करून त्यांना पुढ़ील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की,वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला कोल्हापूर शहरात होत असलेल्या घरगुती पाण्याच्या मीटरच्या चोरीचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या अनुशंगाने माहिती घेऊन तपास करीत असताना ही चोरी पोलिस रेकॉर्डवरील प्रदिप म्हस्के यांने केली असून त्या चोरीतील मीटर विक्री साठी कबनूर येथे ओढ़या जवळ येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी प्रदिप म्हस्के याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 10 पितळी मीटर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आणखी मीटरची चोरी करून ती खोतवाडी येथील बाळु आनंदराव गोसावी याला विकल्याचे सांगितले.त्यानुसार बाळु गोसावी याला ताब्यात घेतले असता त्याने चोरीतील मीटर विकत घेतल्याची कबुली दिल्याने त्याच्या कडील 29 मीटर जप्त करून दोघांच्या कडुन एकूण एक लाख रुपये किमंतीचे 39 मीटर जप्त करून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेले तीन,जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोन आणि शाहुपुरी पोलिस ठाण्यात दोन एकूण सात पाण्याच्या मीटर चोरी प्रकरणातील गुन्हें उघडकीस आणुन 41 पैकी 39 पाण्याच्या पितळी मीटर जप्त करण्यात यश आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस सुरेश पाटील,राम कोळी,सागर माने,गजानन गुरव ,कृष्णात पिंगळे,राजेंद्र वंरडेकर अमित सर्जे ,संजय पडवळ आणि विनोद कांबळे यांनी केली.