प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - आक्षेपार्ह भाष्य करुन भावना दुखावल्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी ज्ञानेश महाराव (पुर्ण पत्ता माहित नाही) यांच्यावर सोमवार दि.09/09/2024 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद संदिप निवृत्ती सासने (वय 43.रा.ए.वॉर्ड वरुणतीर्थवेस शिवाजी पेठ.कोल्हापूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी की, नवी मुंबई येथील दि.22/08/2024 रोजी वाशी येथे असलेल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी आपल्या भाषणात आक्षेपार्ह भाष्य करुन भावना दुखवत आणि जाणीवपूर्वक अपमानास्पद भाष्य करून दोन समाजा मध्ये तेढ़ निर्माण करण्याच्या दृष्टीने वादग्रस्त भाष्य केल्या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.