गणपती विशेष, वर्ष - २०२४
तुकाराम माळी तालीम मंडळ कोल्हापुर.
प्रथम मानाचा गणपती १५० शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष..
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
ऐतिहासिक अशा साठमारीच्या परिसरातील श्री. तुकाराम माळी तालीम मंडळ प्रकाश झोतात आले ते त्याना मिळालेल्या प्रथम मानाच्या गणपतीमुळे..
तब्बल १४९ वर्षाच्या स्थापनेचा इतिहास असलेल्या श्री. तुकाराम माळी तालीम मंडळाची गेली ४० वर्षे देखावे करण्यात हातखंडा आहे. शिस्तबध्द मिरवणुकीमध्ये अनेक वर्षे पारितोषिक पटकाविणार्या या तालमीने सजीव देखावा स्पर्धेत मिळविलेल्या पारितोषिकांना तर गणतीच नाही. विविध ट्राॅफीज , शिल्डस आणि प्रशस्ती पञकांनी तालमीचा हाॅल भरला आहे.
दरवर्षीच्या गणेशोत्सवात या तालमीने वेगळेपण जसे जपले आहे. त्याचबरोबर अनेकविध उपक्रमाने मंडळ सतत चर्चेत आणि प्रसिध्दीच्या झोतात असते. खुल्या रंगमंचावरील देखाव्यासाठी वाघ अस्वल ससा , नाग , साप अशा जिवंत प्राण्यांचा वापर करणारी ही पहिलीच तालीम आहे.
शाहू महाराजांची अस्वलाशी झुंज , चांगदेव - ज्ञानेश्वरी भेट , हुंडाबळी , नेञदान , देहदान उष:काल होता, होता.... अंधश्रध्दा , भारतीय स्वातंञ्याचे अर्धशतक , भारत काल व आज ! रामराज्य येईल का ? स्वदेश , पुरुष भ्रूण आत्महत्या. एक नवी पहाट , एक नवी आशा ! आदि देखाव्यांनी गणेशभक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
दैनिक तरुण भारत , दैनिक सकाळ , जनसेवादल , आय बॅॅंक , ब्लड बॅॅॅॅंक , हसन मुश्रीफ फौंडेशन, कोल्हापुर पोलिस दल , गणराया अॅवाॅर्ड , पंत वालावलकर ट्राॅफी , मेजर दादासो निंबाळकर ट्राॅफी , सेना महाराज ट्राॅफी , मयुर दूध संघ , जनता दल , हिंदू एकता आदि विविध स्पर्धात मंडळाने प्रथम क्रमाकाचे बक्षिस पटकाविले आहेत .
१५ आॅगस्ट व २६ जानेवारी हे राष्टीय सण साजरे करण्याबरोबर , ञ्यंबोली याञा , मोहरम , ग्रामदैवत कालभैरनाथ यांचे उत्सवही दरवर्षी उत्साहात साजरे केले जातात.* *दिपावलीस गरिबांना फराळ , कपडे 👔 , साड्या , ब्लॅकेट यांचे वाटप करण्यात येते तर गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय 🖊📖📕 वस्तु तसेच ड्रेस वाटप.महिलांसाठी रांगोळी तसेच पाककला यांच्या मार्गदर्शनाबरोबर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
श्री. तुकाराम माळी तालीम मंडळाची स्थापना १८७५ सालाची ! तुकाराम विठू माळी यांच्या पश्चात त्यांच्याच नावाने त्यांच्या जागेत तालमीची स्थापना करण्यात आली.
श्री. तुकाराम तालीम मंडळाच्या गणपतीस विसर्जण मिरवणुकीत मानाचे स्थान असते. पालखीतील गणेशाचे व पालखीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतरच कोल्हापुर शहरातील गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. खासबाग मैदानाजवळील विसर्जन मिरवणुकीचा सोहळा खरोखरच पाहाण्यासारखा असतो. विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्याच्या प्रारंभीची ही दृश्य टिपण्यासाठी छायाचिञकार आणि वृत वाहिन्यांच्या प्रतिनिधींची नुसती धांदल उडालेली असते.
गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळाच्या शेकडो महिला कार्यकर्त्या हिरव्या व भगव्या साड्या, फेटे , पुरुष पांढर्या रंगाचा वेश परिधान करुन हातात समाजप्रबोधनाचे फलक घेऊन सामिल झालेले असतात. मोठे मनोहरी दिसत असते हे दृश्य !
मंडळाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे कधीही डाॅल्बीचा वापर करायचा नाही आणि करणार नाही. असा निर्धारच मंडळाच्या कार्यकर्त्यानी केलेला आहे. उत्सवात पारंपारिक 🥁वाद्यांचाच गजर केला जातो.
तर असे हे श्री. तुकाराम माळी तालीम मंडळ आणि त्यांचा उत्सवप्रिय गणेशोत्सव ! आज चौथ्या तर कांहीच्या पाचव्या पिढीची वाटचाल सुरु असलेला पण उत्सव आणि उत्साहात तसूभरही कमी नाही. उलट दरवर्षी तो नव्याच जोमाने आणि नवनवीन कल्यनाने मार्गक्रमणा करतो आहे. *गणपती बाप्पा मोरया 🙏