भटका घोडा दुचाकीच्या आडवा आल्याने दुचाकी वरुन पडल्याने महिलेचा मृत्यु.

त्या परिसरात असलेल्या भटक्या घोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -  निपाणी तालुक्यातील ममदापूर येथील शोभा सदानंद शिपुरे (वय 53) ह्या सोमवारी दि.23/09/2024 रोजी आपला मुलगा ओंकार याच्या  सोबत मोटारसायकल वरुन सव्वा पाच च्या सुमारास जात असताना  साने गुरुजी परिसरात असलेल्या इस्फॉन टेम्पल येथे देवदर्शन घेऊन जात असताना अचानक भटका घोडा दुचाकीच्या आडवा आल्याने दुचाकी स्लिप झाल्याने   दुचाकी वरील शोभा शिपुरे या खाली पडल्याने त्या गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडल्या होत्या .त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वी  मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

      शोभा यांच्या पश्च्यात पती,एक मुलगा आणि  एक मुलगी आहे.त्याचा अपघाती मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.


अपघात घडलेल्या परिसरात अनेक भटकी कुत्री ,भटके घोडे असल्याने ते भर रस्त्यात वावरत असल्याने ते वाहन चालकांच्या आडवे येत असल्याने अशा अपघाताच्या घटना घडुन असे हकनाक बळी जातात.तरी अशा भटक्या प्राण्यांचा संबंधित विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्यातुन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post