प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील चिंचवाड येथे रहात असलेला संदिप रामगोंडा शिरगावे (वय 35) याचा गुरुवार( दि.26) रोजी मध्य रात्रीच्या सुमारास नाडीने गळा आवळुन खून केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी त्याचे सासरे हनमंतअप्पा यल्लापा काळे (वय 48.)आणि सासू गौरवा हनुमंतअप्पा काळे (वय 30.रा दोघे.हनीमनाळ,ता.गडहिग्लज) या दोघांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की , यातील मयत संदिप हा शिरोळ तालुक्यातील चिचवाड येथे रहात असून तो खाजगी ड्रायव्हर म्हणुन काम करीत होता.त्याचे दहा वर्षापूर्वी गडहिग्लज तालुक्यातील हनीमनाळ येथील हनमंतअप्पा काळे यांची मुलगी करुणा हिच्याशी विवाह झाला होता.त्यांना एक लहान मुलगा असून संदिप हा वारंवार दारु पिऊन शिवीगाळ करत मारहाण करीत असे या सर्वाला कंटाळुन त्याची पत्नी माहेरी गेली असल्याने संदिप सासरवाडी येथे गेला होता.तेथे ही दारु पिऊन पत्नीला शिवीगाळ करु लागल्याने तिने आपल्या वडीलांना यातुन काय तरी मार्ग काढ़ा नाहीतर मी जिवाचे काही तरी बरे वाईट करुन घेईन असे सांगितले .त्या वेळी सासरा याने बुधवार (दि.25) रोजी संदिपला गाडी खर्चासाठी पैसे दिले.संदिपने त्या पैशाची दारु पिऊन गडहिग्लज बस स्थानकावर दारुच्या नशेत झिंगत बसला होता.
दरम्यान त्याचे सासू सासरेही कोल्हापूर जाण्यासाठी गडहिग्लज बस स्टॉप वर येताच संदिप दारुच्या नशेत आढ़ळला .त्याला घेऊन गडहिग्लज ते कोल्हापूर या विना वाहक एसटीत बसले त्या वेळी त्या एसटीत या तिघांसह एकूण पाच प्रवासी होते.त्यातील दोन प्रवाशी पुढ़े बसले तर संदिप मधल्या सिटवर आणि सासू सासरे शेवटी बसले होते.आपल्या मुलीला सतत त्रास देतो.आणि मुलीचे विचार त्यांच्या मनात घोळु लागल्याने असा मोका परत येणार नाही असे म्हणत त्याच्या बँग घेऊन त्यातील विजारी सारख्या प्यंट मधिल नाडी काढ़ुन दारुच्या नशेत असलेला संदिप याचा चालत्या बसमध्ये कागलच्या दरम्यान नाडीने गळा आवळुन खून केला .आता याचे काय करायचे म्हणत एसटी रात्री दिडच्या सुमारास कोल्हापुर स्थानकात आल्यानंतर या दोघांनी त्याची बँग खाली ठेऊन त्याला बस स्थानकात आडोशाला ठेऊन परत आपल्या गावी गेले .बस स्थानकात असलेल्या पोलिस कर्मचारी यांना अनोळखी इसम बेशुध्दावस्थेत पडल्याचे आढ़ळल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला होता.त्याच्या खिशात डायरी सापडल्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर मिळाला असता पोलिसांनी संपर्क करून त्याच्या पत्नीला माहिती देऊन बोलावून घेतले.
शाहुपुरी पोलिसांनी मिळालेल्या फुटेजच्या आधारे माहिती घेऊन हे फुटेज गडहिग्लज येथील पोलिसांना पाठवून याची माहिती घेण्यास सांगितले.त्यानुसार गडहिग्लज पोलिसांनी पाठविलेले फुटेज आणि गडहिग्लज येथील फुटेज तपासले असता मयत आणि सासू सासरे असे तिघे जण एसटीत चढ़ताना आढ़ळले .याची माहिती घेऊन हनीमनाळ येथे जाऊन संदिपच्या सासू सासरे यांना ताब्यात घेऊन शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.या मुळे याच्या मारेकरया प्रर्यत पोहचण्यास शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर आणि त्यांच्या पथकाला यश आले.पुढ़ील तपास शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.