टेरेसवर शिडीवरुन नैवेद्य ठेवत असताना पाय घसरून पडल्याने वृध्दाचा मृत्यु.

 

पुणे न्यूज एक्सप्रेस :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - शुक्रवार पेठेतील  जयवंत बाबूराव जाधव  (वय 70.रा. आशिर्वाद बंगला ,डी वॉर्ड)  हे रविवार (दि.29) रोजी सकाळी अकराच्या सुमारास घरी महालय असल्याने रहात्या घरात टेरेसवर शिडीवरुन नैवेद्य ठेवत असताना अचानक पाय घसरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागल्याने जखमी अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी सव्वा बाराच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post