व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासमवेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवा - पॅथर आर्मी ची मागणी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापुर : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासमवेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिने वाढविण्याची मागणी पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक मुख्य नेते फिरोज मुल्ला सर व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी मुखमंत्री एकनाथ शिदे यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे .

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासमवेत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र सध्या जात पडताळणी समित्यांकडे लाखोंच्या प्रमाणात पेंडन्सी असल्यामुळे हजारो विद्यार्थी मागास प्रवर्गातून प्रवेशापासून वंचित राहणार धोका निर्माण झाला आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी राज्य सरकारने तात्काळ अनुसूचित जाती , जमाती , विमुक्त जाती भटक्या , जमाती व इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात पडताळणी सादर करण्याची मुदत सहा महिने वाढवावी  

2024 - 25 च्या शैक्षणिक वर्षांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पडताळणीसाठी मोठी धडपड सुरू आहे

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २२ जुलै २०२४ रोजी एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची सवलत लागू करून त्यांना मात्र सहा महिने प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ दिलेली आहे. एसबीईसीच्या विद्यार्थ्यांसाठी जे नियम व निकष वापरण्यात आलेले आहे त्यानुसारच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ मिळायला हवा त्यामुळे राज्य सरकारने  विद्यार्थ्यांसाठी देखील परिपत्रक काढून त्यांना सवलत देण्याचे काम करावे 

जात पडताळणी अधिनियमन 2012 मध्येच अर्ज केल्यापासून 90 दिवसांमध्ये पडताळणी सादर करण्याचे नमूद असतानाही सीईटी विभागाकडून मात्र या नियमाला हरताळ फासवत मनमानी पद्धतीने किंबहुना केवळ मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हावे या गैरउद्देशानेच चुकीचे परिपत्रक काढून प्रवेशावेळीच जात प्रमाणपत्र देण्याचे बंधन घातलेले आहे. हे परिपत्रक संपूर्णतः चुकीचे असून जात प्रमाणपत्र अधिनियमांचे उल्लंघन करणारे असल्यामुळे ती दुरुस्ती होणे आवश्यक आहे 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील 

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासमवेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिने वाढवावी अन्यथा   पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संस्थापक राष्ट्रीय मुख्य नेते फिरोज मुल्ला सर व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे .

Post a Comment

Previous Post Next Post